वर्धा-हिंगणघाट मार्गावर अपघात; बस व ट्रेलरची जोरदार धडक – १२ जखमी
दिनांक 26 जुलै २०२५ वर्धा-हिंगणघाट मार्गावरील धोत्रा चौरस्ता येथे एक गंभीर अपघात घडला. वर्धा येथून हिंगणघाटकडे जाणारी प्रवासी बस आणि पेट्रोल पंपावरून निघणाऱ्या ट्रेलर यांच्यात जोरदार धडक झाली. या अपघातात बसचालक गंभीर जखमी झाला असून, १० ते १२ प्रवासी जखमी झाले आहेत. सर्व जखमींना तात्काळ पोलीस आणि स्थानिक नागरिकांच्या मदतीने सेवाग्राम रुग्णालयात दाखल करण्यात आले…