सुतीमिलमजदूरसंघटनेच्यावतीनेदिवंगतकामगाराचेकुटुंबीयांना१लाख,३५हजाराचीआर्थिकमदत


. समिर कुणावार, मिलिंद देशपांडे यांचे पुढाकाराने मिळाली मदत
गिमाटेक्स वणी युनिटच्या कामगारांकडून दिवंगत कामगाराचे परीवाराला मदतीचा हात म्हणून १ लाख,३५ हजार रुपयांची आर्थिक मदत देण्यात आली.
गिमाटेक्स इंडस्ट्रीज वणी युनिट येथिल रिंगफेम/आटोकोणर पिव्ही या विभागात भिमराव जंगले हे कार्यरत होते, त्यांचे दि.५ सप्टेंबर २०२५ रोजी हृदयविकाराने निधन झाले.
उपरोक्त अनुषंगाने वर्धा जिल्हा सुती मिल मजदूर संघटनेचे अध्यक्ष तथा विधानसभा क्षेत्राचे आमदार समिर कुणावार, श्री मिलिंद देशपांडे यांच्या अध्यक्षतेखाली गिमाटेक्सचे फॅक्टरी मॅनेजर श्री पठाण यांनी सतत पाठपुरावा करून दिवंगत कामगारांच्या परीवाराला आर्थिक मदत म्हणून सर्व कामगारांच्या पगारातून प्रती कामगार १०० रूपये प्रमाणे कपात करून एकूण रक्कम १ लाख ३५ हजार,७०० रुपये रक्कम त्यांच्या परीवाराला आर्थिक मदत म्हणून देण्यात आली.
यावेळी संघटनेचे जनरल सेक्रेटरी श्री पांडुरंग बालपांडे, दामोधर देशमुख, दिवाकर बरबटकर, जिवन भानसे,प्रशांत शेळके,हेमंत भगत,विनोद कावळे,श्रावण थुटे, लक्ष्मण जयपुरकर,जयंत बावणे,राहुल देशमुख, मनोहर जुमडे,विजय थुल, विनोद कोल्हे,राकेश तराळे इत्यादी मान्यवर उपस्थित होते.