पालघर : मोखाडा तालुक्यातील आमला गावात धक्कादायक घटना

दि : 25 नोव्हेंबर 2025

मोखाडा तालुक्यातील अत्यंत दुर्गम असलेल्या आमला गावातील एका बाळंतीण महिलेला प्रसूतीनंतर रुग्णवाहिकेने अर्ध्या रस्त्यात सोडून देण्याची गंभीर घटना घडली आहे. नवजात बाळासह तब्बल २ किलोमीटर पायपीट करण्याची वेळ या महिलेला आली. घटनास्थळ दाट जंगल परिसरात असल्याने ही बाब अधिक चिंताजनक ठरली आहे.

या निष्काळजीपणामुळे नागरिकांत तीव्र संताप व्यक्त होत असून, घनदाट जंगलांतून जाणाऱ्या मार्गावर बाळंतीण महिलेला रुग्णवाहिकेतून उतरविण्यात कशी परवानगी दिली? असा संतप्त सवाल स्थानिकांकडून उपस्थित केला जात आहे.

स्थानिक प्रशासनाने या घटनेची तात्काळ चौकशी करून संबंधितांवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी होत आहे.

One thought on “पालघर : मोखाडा तालुक्यातील आमला गावात धक्कादायक घटना

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *