जलजीवन मिशन अंतर्गत निधी उपलब्ध करुन दया व कंत्राटदारांच्या आत्महत्या थांबवा
खासदार अमर काळे यांची केंद्रीय जलशक्ती मंत्री सी.आर. पाटील हयांचेकडे मागणी. केंद्र व राज्य शासनाचे निधीतून महाराष्ट्र राज्यात जलजीवन मिशन योजना राबविण्यात आली. हयात अनेक लहान कंत्राटदार व सुशिक्षित बेरोजगार अभियंत्याने नोकरी लागत नसल्याने कंत्राटदारीचा व्यवसाय सुरु केला. नविन व्यवसाय असल्याने उसनवारीचे व्याजाने किंवा थोडयाफार अल्पशा पैशाची जुळवाजुळव करुन काम सुरु केले. साहित्य उधारीवर निधीचा…