NIPER परीक्षेत भारतात प्रथम क्रमांक मिळवणाऱ्या विद्यार्थिनीच्या यशाकडे शासनाचा दुर्लक्ष!

वर्धा: संजय गिरी (हिंगणघाट तालुका प्रतिनिधी)

वर्धा जिल्ह्यातील हिंगणघाट तालुक्यातील मोझरी शेकापूर येथील विद्यार्थिनी कु. स्नेहा दीपक काळे हिने राष्ट्रीय पातळीवरील NIPER (National Institute of Pharmaceutical Education and Research) परीक्षेत पहिल्या व दुसऱ्या फेरीत तब्बल ९८% गुण मिळवत भारतामध्ये प्रथम क्रमांक पटकावला आहे.

स्नेहा सध्या यवतमाळ जिल्ह्यातील कळंब येथील जगदंबा फार्मसी कॉलेज येथे शिक्षण घेत आहे. आपल्या अभ्यासातून आणि चिकाटीमुळे तिने देशभरातून ही अत्युच्च शैक्षणिक कामगिरी केली आहे.

मात्र, दुर्दैवाने तिच्या या ऐतिहासिक यशाकडे ना शासन, ना शिक्षण विभाग, ना स्थानिक प्रशासन यांनी कोणतीही दखल घेतलेली नाही, ही बाब अत्यंत खेदजनक आहे. तिच्या कुटुंबीयांसह गावकरी आणि शिक्षणप्रेमींमध्ये नाराजी व्यक्त होत आहे.

वर्धा जिल्ह्याच्या या गुणवंत विद्यार्थिनीने संपूर्ण महाराष्ट्राला अभिमान वाटेल असे यश मिळवले असताना, शासनाने तिचा सन्मान, प्रोत्साहन, तसेच शिष्यवृत्ती योजना व राष्ट्रीय गौरव मिळवून देण्यासाठी पावले उचलावीत, अशी मागणी आता होत आहे.

Laksh Vedhak च्या वतीने कु. स्नेहा काळे हिला हार्दिक शुभेच्छा आणि पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा!