*निकाल अपेक्षित लागो की अनपेक्षित मात्र सत्याचा बाजून लागला पाहिजे!…*
*महानगरपालिकेची निवडणूक तब्बल ९ (नऊ) वर्षानंतर जाहीर झाली.*
*तेव्हापासून महाराष्ट्रात नाट्यस्पद घडामोडी घडल्या.*
*निष्ठावंत विरुद्ध आयाराम-गयाराम असा सामना रंगला.*
*काहींनी एबी फॉर्म गिळले काहींनी फाडले काहींचे कॉलर पकडून फॉर्म मागे घ्यायला लावले काहींना पैशांच्या ऑफर दिल्या तर काहींचे फॉर्म भरताना पैसे हिसकवून घेतले.*
*बऱ्याच लोकांना या सर्व गोष्टी महाराष्ट्राच्या राजकारणाला न शोभून दिसणाऱ्या अशोभनिय जरी वाटत असल्या तरी त्यांच्या माहिती करता सांगतो या सर्व गोष्टी महाराष्ट्रात सध्या तरी गेल्या काही वर्षांपासून अत्यंत छोट्या पातळीच्या झालेल्या आहेत.*
कारण इथल्या राजकारण्यांनी महाराष्ट्राच्या सुसंस्कृत पणाची अब्रू ही वेशीवर टांगलेली आहे.
त्याच पद्धतीने जसे तिकीट वाटपा वरून कार्यकर्ते नाराज दिसले.
नेते मात्र संपूर्ण वाद विवाद फूट गट विसरून परत निवडणुकीच्या रिंगणात एकत्र दिसले.
एकीकडे ठाकरे बंधू एक झालेत.
दुसऱ्या बाजूस काका आणि दादा एक सोबत आलेत.
देशाच्या राजकारणात नव्या युतीची नांदी म्हणून काँग्रेस आणि भाजप एकत्र आलेत.
विदर्भात अकोल्यामध्ये भाजप आणि एमआयएम एकत्र आलेत.
या सर्व गदारोळामध्ये सर्व स्थानिक पातळीवरच्या युती आघाड्यांमध्ये लोकांच्या मनात प्रचंड संताप आणि संभ्रम निर्माण झाला.
काही लोकांच्या मते तर निवडणुकीवर बहिष्कार टाकला पाहिजे अशी उद्गारही आम्ही ऐकले.
मात्र लोकशाही भक्कम करण्यासाठी मतदान हे आवश्यक आहे त्यासाठी निदान नोटा तरी आम्ही दाबू मात्र मतदान करू असंही काही लोक म्हटले.
काही ठिकाणांची मुद्दे प्रचंड वेगळे काही उमेदवार खरं काहीतरी लोकांसाठी करण्याच्या तळमळीने जिद्दीन मैदानात उतरलेत तर काहींना फक्त सध्या तरी instagram वर वायरल होणाऱ्या हल्क प्रमाणे फॉर्च्यूनर घ्या साठी निवडणुकीत उतरले.
निदान यावेळी तरी निवडणुकीत मराठी माणूस मराठी माणसांच्या बाजूने उभा राहील की त्याचे विभाजन होईल जर तसे झाले तर नेमका फटका कुणाला आणि राजकीय फायदा कुणाला हे समजून घ्यावे लागेल काहीही झालं तरी कुणाचीही एकजूट ही असल्याशिवाय कुणा एकाच बहुमतीने अशक्य आहे म्हणून कुणाच्यातरी एकाच्या बाजूने त्यांनी सुद्धा कौल द्यावा असे सबंध मुंबईसाठी महाराष्ट्राला वाटायला लागलं.
अर्थातच ठाकरे येतील असं महाराष्ट्र मुंबईसाठी बोलतोय.
त्या राजकारणात तर निव्वळ विरोधकांनी धार्मिक आणि परप्रांतीय ध्रुवीकरण करून मतदारांना पूर्णपणे संभ्रमात टाकला मात्र नेमकं १५ तारखेला मतदान करून १६ ला कुठला निकाल मतदार हाती देतो हे पहाव लागेल.
विदर्भ मराठवाडा पश्चिम महाराष्ट्रातल्या संपूर्ण निवडणुका त्या त्या भागातल्या परिस्थितीनुसार काळानुसार नेत्यांच्या परिणे लढल्या जात आहे.
पण महाराष्ट्राचं मुख्यतः लक्ष मुंबई वरती आहे.
म्हणूनच मुंबई असो पुणे असो नाशिक असो कोल्हापूर असो छत्रपती संभाजीनगर असून नागपूर असो अमरावती असो नवे नवे तर महाराष्ट्रातल्या सर्व महानगरपालिका मतदार सुजाणतेने मतदान करतील आणि येणारा निकाल हा सत्याच्या बाजूने देईल नक्की सत्तेच्या.
शेवटी
*रंधा मधून ज्यांच्या शरीरास घाम येतो भेटावयास अल्ला, कृष्णा आणि माझा राम येतो या नेत्यांना काय कळावी किमया आमच्या बडीची ज्यांच्या उलटी मधून सुद्धा काजू बदाम येतो*.
नेमकं कुणी कुणाचं नसतच पण काही लोक सातत्याने आपल्यासाठी झटत असतात त्यांच्यासाठी मतदान करूया आणि सत्य रुपी सूर्य हा आपल्यासाठी उगेल असा आशावाद बाळगुया करूया.
महाराष्ट्रातील महानगरपालिका निवडणूक : सत्याचा कौल कोणाच्या बाजूने?
Mwmbetlogin, logging in for some action! Hope the odds are in my favor today. Wishing everyone good luck out there. Get logged in at mwmbetlogin
82jili, might give this one a try after work. Hopefully, it has some good bonuses. Wish me luck! Give it a shot at 82jili
Heard about vuagaazad and gave it a shot. The games are decent and it’s a fairly user-friendly platform. Might become a regular here! Give it a whirl. vuagaazad