जेष्ठ नागरिक हे नविन पिढीसाठी दिशादर्शकमाजी खासदार रामदास तडस यांचे प्रतिपादन


देवळी: ज्येष्ठ नागरिकांना वार्धक्यात अधिक सुरक्षित व सन्मानजनक जीवन जगता यावे. यासाठी बऱ्याच सोयी-सवलती आहेत. शिवाय दारिद्ररेषेखालील ज्येष्ठांनाही आजारपणात चांगली आरोग्य सेवा, अपंगत्वावर मात करणारी उपकरणे, आरोग्य विमा आदी सुविधा पुरवण्याचा संकल्पही आहे. जेष्ठ नागरिकांच्या हितासाठी महत्वपुर्ण निर्णय घेतलेले आहे. यामध्ये आयुष्मान योजना, वयोश्री योजना, अटल पेंशन योजना, राष्ट्रीय वृद्धापकाळ योजना, बस पास, विमान प्रवास, रेल्वे प्रवासामध्ये अधिक सवलत, राज्य परिवहन महामंडळ यांनी देखील शिवशाही बसेस मध्ये वरीष्ठ नागरिकांना सवलत देण्याचा निर्णय घेतला असून या सह अनेक सवलती केन्द्र व राज्यशासनाच्या माध्यमातून राबविल्या जात आहे. या योजना जेष्ट नागरिकापर्यंत पोहचविणे आवश्यक आहे, कारण जेष्ठ नागरिकसुध्दा देशाच्या विकासासाठी महत्वपुर्ण घटक आहे, तसेच जेष्ठ नागरिकांचे अनुभव म्हणजे देशाच्या सर्वांगीण विकासाठी मार्गदर्शनचा अमुल्य ठेवा, जेष्ठ नागरिक हे नविन पिढीसाठी दिशादर्शक असुन त्यांच्या आशिर्वादाशिवाय समाज प्रगती करु शकत नाही, असे प्रतिपादन माजी खासदार रामदास तडस यांनी जिल्हा स्तरीय जेष्ठ नागरिक मेळावा सत्कार समारंभ कार्यक्रमात केले.

राजे छत्रपती शिवाजी महाराज नाटयगृह देवळी येथे आधारवड जेष्ठ नागरिक परिवारच्या वतीने जागतिक जेष्ठ नागरिक दिनानिमीत्य जिल्हास्तरीय जेष्ठ नागरिक मेळावा व सत्कार कार्यक्रम माजी खासदार रामदासजी तडस यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाला, यावेळी देवळी विधानसभा क्षेत्राचे आमदार राजेश बकाने, बबनराव वानखेडे, डॉ. नारायण निकम, वसंतराव गुल्हाने, सौ. शोभा तडस, प्रतिभा भागवतकर, डॉ. नरेन्द्र मदनकर,, शरद आदमने, डॉ. हाशम शेख, मुरलीधर बेलेखोडे, चंद्रशेखर दंडारे, दामोधर राऊत, उपस्थित होते.

यावेळी देवळी विधानसभा क्षेत्राचे आमदार राजेश बकाने, बबनराव वानखेडे, डॉ. नारायण निकम यांनी समोयोचीत मार्गदर्शन केले.

यावेळी विविध क्षेत्रात कार्यरत असलेल्या जेष्ठ नागरिकांचा सत्कार करण्यात आला.

        सदर कार्यक्रमाचे प्रास्तावीक डॉ. हाशम खेख यांनी केले, तर संचालन दामोधर राऊत व सत्कार संचालन शेषराव बिजवार यांनी केले तर उपस्थितांचे आभार चंद्रशेखर दंडारे यांनी मानले, यांनी केले कार्यक्रमाकरिता जेष्ठ नागरिक पांडूरंग भालशंकर, रामदास नवघरे, अरुण महाबुध्दे, खुशाल सातपुते, गुणवंत प्रधान, शामकांत जिभकाटे, संध्या भगत, विद्याताई भोयर, ज्योती देवतारे रवी कारोटकर, उमेश कामडी, संजय मुजबैले, कमलेश ढोक, रमेश सातपुते व बहुसंख्य जेष्ठ नागरीक उपस्थित होते

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *