श्री संताजी सेवा व सांस्कृतिक मंडळ वर्धा व्दारा गुणवंत विद्यार्थी गुणगौरव सोहळा व जेष्ठ नागरिकांचा सत्कार समारोह संपन्न

समाजाचे संघटन वाढीकरिता सर्वांनी प्रयत्न करणे गरजचे,
माजी खासदार रामदास तडस, अध्यक्ष, महाराष्ट्र प्रांतिक तैलिक महासभेचे

वर्धाः गत 40 वर्षापासून संघटनाचे काम करीत आहे, समाजाचे संघटन वाढवायचे असेल तर सामुहीक प्रयत्न गरजचे आहे,  यासाठी व्यासपीठावरील सर्वांनी समाजाचे संघटन वाढविण्याकरित प्रयत्न करणे गरजेचे आहे,  सर्व गुणवंताचे व जेष्ठ नागरिकांचे अभिनंदन व पुढील वाटचालीस शुभेच्छा,  समाजात काम करताना समाजरूण फेडण्याचे अनेक प्रकार आहेत,त्यात गुणवंतांनी, ज्ञानवंतांनी, भाग्यवंतांनी आणि कष्टक-यांनी आपले ज्ञान, अपार कष्ट, मेहनत, चिकाटी व प्रामाणीकपणा या जोरावर जे यश प्राप्त केलेले असते ते समाजापुढे येणे महत्त्वाचे असते. त्यांच्या यशाचे कौतुक करून त्यांच्याकडून भावी आयुष्यात अधिक चांगले समाजोपयोगी व दिशादर्शक कामे होऊन त्यांच्या कार्यांचा झेंडा सर्वत्र फडकावा असे मत संताजी सेवा सांस्कृतिक मंडळ, कृष्णनगर वर्धा च्या वतीने आयोजीत गुणवंत विद्यार्थी गुणगौरव सोहळा कार्यक्रमात अध्यक्षीय भाषणात महाराष्ट्र प्रांतिक तैलिक महासभेचे अध्यक्ष माजी खासदार रामदासजी तडस यांनी व्यक्त केले. 

            संताजी सेवा व सांस्कृतिक मंडळ, कृष्णनगर, वर्धा च्या वतीने वर्धा येथे ला  संताजी सभागृह, कृष्णनगर, वर्धा  येथे  गुणवंत विद्यार्थी गुणगौरव सोहळा व जेष्ठ नागरिकांचा सत्कार आयोजीत करण्यात आले, कार्यक्रमाचे अध्यक्ष महाराष्ट्र प्रांतिक तैलिक महासभेचे अध्यक्ष माजी खासदार रामदासजी तडस, उद्घाटक म्हणून माजी खासदार सुरेश वाघमारे व शेखर शेंडे हे होते,  कार्यक्रमाला प्रमुख पाहणे डॉ. सतिश हरणे, नरेश पारधी, डॉ. नितिन भलमे, रविभाउ बालपांडे, सौ. शोभाताई तडस, मिलींद भेंडे, राजेश काळबांडे, सुधाकर सुरकार, विनायक तेलरांधे, अशोक कलोडे, देवा निखाडे, विपीन पिसे उपस्थित होते.

           यावेळी जिल्ह्यातील 10 व 12 तील 130 विध्यार्थ्यांचा, 35जेष्ठ नागरिक, 2 पीएचडी धारक व 4 क्रीडा क्षेत्रात उत्कृष्ट कार्य करणा-या  4 बालकाचा, विविध क्षेत्रात कार्य करणा-या उद्योजकांचा सत्कार करण्यात आला. 

            दहावी बारावी नंतर विद्यार्थ्यांनी आपल्या भविष्याचा विचार करून आपले ध्येय निश्चित करावे, योग्य करिअरची निवड केल्यास यश दूर नाही. यासाठी योग्य शिक्षण क्षेत्राची निवड करावी. नविन तंत्रज्ञानाचा वापर जो ज्ञाना साठी करतो, तोच या युगात प्रगती करू शकतो, विद्यार्थ्यांनी रडले नाही पाहिजे, लढले पाहिजे म्हणजे रडल्याने केवळ सहानभूती मिळते आणि लढल्याने यश मिळते. त्याप्रमाणे ध्येय निश्चित करून विद्यार्थ्यांनीही आयपीएस अधिकारी होण्याचे स्वप्न बघितले पाहिजेत. असे यावेळी माजी खासदार सुरेश वाघमारे म्हणाले.

यावेळी शेखर शेंडे, डॉ. सतिश हरणे, नरेश पारधी, डॉ. नितिन भलमे, रविभाउ बालपांडे, मिलींद भेंडे यांनी समोयोचीत मागदर्शन केले

            कार्यक्रमाचे प्रास्तावीक संस्थेचे अध्यक्ष शैलेन्द्र झाडे यांनी केले    कार्यक्रमाचे संचालन प्रा. विद्या नरड यानी केले, तर आभार संस्थेच कोषाध्यक्ष नितीन साठोने यांनी व्यक्त केले, कार्यक्रमाला संस्थेचे सचिव हरिष हांडे, किशोर गुजरकर, जगन्नाथ लाकडे, चंद्रकांत चामटकर, प्रशांत बुरले, सचिन सुरकार, सुनिल शिंदे, मनिष तेलरांधे, संजय आष्टनकर,सुधीर भुते, सुनिल ढवळे व महिला मंडळ उपस्थित होते,  कार्यक्रमाला विध्यार्थी तसेच मोठया संख्येने पालक व समाजबांधव उपस्थित होते.