lakshvedhak.com

भारतीय महिला क्रिकेट संघाच्या जागतिक विजयानिमित्त महाराष्ट्र सरकारकडून राज्यातील खेळाडूंना गौरव

मुंबई, दि. ४ नोव्हेंबर २०२५ भारतीय महिला क्रिकेट संघाने नुकताच झालेल्या आयसीसी महिला क्रिकेट विश्वचषक स्पर्धेत ऐतिहासिक विजय मिळवला असून संपूर्ण देशाचा गौरव वाढवला आहे. या विजयानिमित्त महाराष्ट्र सरकारने राज्यातील तीन खेळाडूंना प्रत्येकी ₹२.२५ कोटींचे पारितोषिक जाहीर केले आहे. राज्य सरकारच्या क्रीडा धोरणानुसार, महाराष्ट्रातील जेमिमा रॉड्रिग्ज, स्मृती मंधाना आणि राधा यादव या खेळाडूंना प्रत्येकी ₹२.२५…

Read More

राजस्थानात बस आगीत दोघांचा मृत्यू, १२ जखमी

जयपूरजवळ उच्च-दाब तारेला स्पर्श झाल्याने मजूर बसला आग, अनेक गंभीर जखमी जयपूर, २८ ऑक्टोबर २०२५ | राजस्थानच्या राजधानी जयपूरपासून सुमारे ५० किलोमीटर अंतरावर असलेल्या तोडी गावात मंगळवारी सकाळी एक भीषण बस आग दुर्घटना घडली. स्थलांतरित मजुरांना घेऊन जाणारी स्लीपर बस ११,००० व्होल्टच्या उच्च-दाब विद्युत तारेला स्पर्श झाल्यानंतर आगीच्या चपेटीत आली. या अपघातात दोन व्यक्तींचा जागीच…

Read More

नांदेड: अतिवृष्टीची नुकसानभरपाई न मिळाल्याने संतप्त शेतकऱ्याने फोडली तहसीलदाराची गाडी

मुदखेड (नांदेड), 27 ऑक्टोबर 2025 – अतिवृष्टीच्या पीक नुकसानीचे अनुदान न मिळाल्याने संतप्त झालेल्या एका शेतकऱ्याने नांदेड जिल्ह्यातील मुदखेड तालुक्यातील तहसील कार्यालयात तहसीलदाराची सरकारी गाडी फोडली. सोमवारी दुपारी घडलेल्या या घटनेने प्रशासनात खळबळ माजली आहे. घटनेची सविस्तर माहिती शेतकरी साईनाथ संभाजी खानसोळे यांनी मुदखेड तालुक्यातील अतिवृष्टीत झालेल्या पीक नुकसानीचे अनुदान न मिळाल्याने काल (27 ऑक्टोबर)…

Read More

बच्चू कडूंचा ‘महाएलगार’ आंदोलन: शेतकरी कर्जमाफीसाठी नागपूरला धडक

नागपूर, २८ ऑक्टोबर २०२५ — प्रहार जनशक्ती पक्षाचे नेते आणि अचलपूर मतदारसंघाचे आमदार बच्चू कडू यांनी आज नागपूरमध्ये ‘महाएलगार’ नावाचे भव्य शेतकरी आंदोलन सुरू केले आहे. शेतकरी कर्जमाफी, किमान हमीभाव (MSP) आणि शेतकऱ्यांच्या हक्कांसाठी हा मोर्चा काढण्यात येत आहे. मोर्चाचा मार्ग आणि नेतृत्व बेलोरा गावापासून सुरू झालेला हा मोर्चा अडगाव, यावली शहीद आणि मर्डी मार्गे…

Read More

ग्रामपंचायतींच्या सर्वांगीण विकासासाठी विविध अभियानात सहभाग नोंदवावा — राज्यमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर

दि. 27 ऑक्टोबर 2025 | वर्धा राज्य शासनाच्या वतीने ग्रामपंचायतींच्या सर्वांगीण विकासासाठी विविध अभियान राबविली जात असून, उत्कृष्ट कार्य करणाऱ्या ग्रामपंचायतींना पुरस्कार देऊन गौरविण्यात येते. ग्रामपंचायतींनी या अभियानांमध्ये सहभागी होऊन पुरस्काराची रक्कम विकासासाठी वापरावी, असे आवाहन राज्यमंत्री (सार्वजनिक आरोग्य, कुटुंब कल्याण, पाणीपुरवठा व स्वच्छता, ऊर्जा, महिला व बाल विकास) मेघना साकोरे-बोर्डीकर यांनी केले. त्या पिपरी…

Read More

सुतीमिलमजदूरसंघटनेच्यावतीनेदिवंगतकामगाराचेकुटुंबीयांना१लाख,३५हजाराचीआर्थिकमदत

सुती मिल मजदूर संघटनेच्या वतीने दिवंगत कामगाराच्या कुटुंबीयांना १ लाख ३५ हजार रुपयांची आर्थिक मदत प्रदान करण्यात आली.
• दिवंगत कामगाराच्या कुटुंबाच्या सहाय्यासाठी संघटनेने दाखवलेली संवेदनशीलता प्रशंसनीय ठरली आहे.
• या मदतीमुळे कामगारांच्या कल्याणासाठी संघटनेची वचनबद्धता पुन्हा एकदा अधोरेखित झाली.

Read More

खरबी चौकात वेगवान बसच्या धडकेत १७ वर्षीय मुलीचा मृत्यू

नागपूर: खरबी चौक येथे मंगळवारी पहाटे झालेल्या एका भीषण अपघातात १७ वर्षीय मुलीचा जागीच मृत्यू झाला. या दुर्दैवी घटनेत भाग्यश्री जियालाल तेंभारे (वय १७) या तरुणीचा वेगवान बसच्या धडकेत मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. घटनेचा तपशील मा अंबे कॉलनी, गरीब चौक जवळ राहणाऱ्या भाग्यश्रीवर खरबी चौक येथे एका वेगवान बसने जोरदार धडक दिली. प्रत्यक्षदर्शींच्या…

Read More

जेष्ठ नागरिक हे नविन पिढीसाठी दिशादर्शकमाजी खासदार रामदास तडस यांचे प्रतिपादन

देवळी: ज्येष्ठ नागरिकांना वार्धक्यात अधिक सुरक्षित व सन्मानजनक जीवन जगता यावे. यासाठी बऱ्याच सोयी-सवलती आहेत. शिवाय दारिद्ररेषेखालील ज्येष्ठांनाही आजारपणात चांगली आरोग्य सेवा, अपंगत्वावर मात करणारी उपकरणे, आरोग्य विमा आदी सुविधा पुरवण्याचा संकल्पही आहे. जेष्ठ नागरिकांच्या हितासाठी महत्वपुर्ण निर्णय घेतलेले आहे. यामध्ये आयुष्मान योजना, वयोश्री योजना, अटल पेंशन योजना, राष्ट्रीय वृद्धापकाळ योजना, बस पास, विमान प्रवास,…

Read More

आकांक्षा प्रकाशनचे दोन दिवसीय आयोजनसेवाग्राम येथे सहावी राज्यस्तरीय लिहित्यांची कार्यशाळा

वर्धा – आकांक्षा प्रकाशनाद्वारे दि. १ व २ नोव्हेंबर रोजी सेवाग्राम आश्रम परिसरात सहावी राज्यस्तरीय लिहित्यांची कार्यशाळा आयोजित करण्यात आली आहे.या कार्यशाळेचे उद्घाटन ‘बाईमाणूस’कार करुणा गोखले यांच्या हस्ते होणार असून अध्यक्षस्थानी ९०व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष, ज्येष्ठ समीक्षक डॉ. अक्षयकुमार काळे राहतील. यावेळी प्रमुख अतिथी म्हणून डॉ. प्रमोद मुनघाटे यांची उपस्थिती राहणार आहे.जे…

Read More

श्रावणात भाविकांची पारंपरिक कावड यात्रा उत्साहात पार

देवळी: श्रावण महिन्यानिमित्त देवळी शहरातील देहू-आळंदी भाग क्र. 2, यवतमाळ रोड येथील प्राचीन शिवमंदिरात पारंपरिक कावड यात्रा आणि भजन कार्यक्रम मोठ्या भक्तिभावाने पार पडले. या यात्रेला भाविकांचा मोठ्या प्रमाणात प्रतिसाद लाभला. यशोदा नदीवरून जल आणून भाविकांनी कावड यात्रेद्वारे देहू-आळंदी पार्क भाग क्र. 2 येथील प्राचीन शिवलिंग पिंडीवर जल अर्पण करून धार्मिक विधी संपन्न केला. कार्यक्रमाचे…

Read More