राज्यात थंडीचा जोर वाढला! नाशिकमध्ये पारा 5.6 अंशांवर; पुणेही गारठलं, हंगामातील निचांकी तापमानाची नोंद
राज्यातील विविध भागांमध्ये थंडीचा प्रभाव दिवसेंदिवस वाढत चालला असून नागरिकांना कडाक्याच्या थंडीचा सामना करावा लागत आहे. विशेषतः उत्तर महाराष्ट्र आणि पश्चिम महाराष्ट्रात थंडीचा जोर अधिक जाणवत असून नाशिकमध्ये यंदाच्या हिवाळ्यातील आतापर्यंतचे सर्वात कमी तापमान नोंदवले गेले आहे. नाशिकचा पारा थेट 5.6 अंश सेल्सिअसपर्यंत घसरल्याने शहरासह ग्रामीण भागातही प्रचंड गारवा जाणवला. पहाटेच्या वेळी थंडीचा कडाका इतका…