जेफ्री एपस्टीन प्रकरणातील गोपनीय कागदपत्रांमुळे देशाच्या राजकारणात उलथापालथ?; तीन आजी-माजी खासदारांचा उल्लेख, ‘ऑपरेशन सिंदूर’ थांबवण्यामागे दबावाची शक्यता — पृथ्वीराज चव्हाणांचा खळबळजनक दावा
अमेरिकेतील उद्योजक जेफ्री एपस्टीन प्रकरणाशी संबंधित गोपनीय कागदपत्रे लवकरच सार्वजनिक होणार असल्याने आंतरराष्ट्रीय तसेच देशांतर्गत राजकारणात मोठी उलथापालथ होण्याची शक्यता आहे, असा खळबळजनक दावा माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी मंगळवारी (ता. 16) पुण्यात केला. ही गोपनीय कागदपत्रे 19 डिसेंबरपर्यंत समोर येणार असून त्यामध्ये भारतातील तीन आजी-माजी खासदारांचा समावेश असल्याचा दावा त्यांनी केला. पृथ्वीराज चव्हाण यांनी…