
दिनांक: २० जुलै २०२५
स्थळ: पुणे
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या त्रिशताब्दी जयंतीनिमित्त, “अहिल्यादेवी सामाजिक व शैक्षणिक विकास ट्रस्ट” च्या वतीने विविध क्षेत्रात कार्य करणाऱ्या कर्तृत्ववान महिलांचा सत्कार आणि गौरव पुरस्कार सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला.
या कार्यक्रमात शैक्षणिक, सामाजिक, आरोग्य, उद्योग, क्रीडा, साहित्य व अन्य क्षेत्रांत उल्लेखनीय योगदान देणाऱ्या महिलांचा विशेष सन्मान करण्यात आला.
याच निमित्ताने डॉ. अपर्णा शैलेश हम्बर्डे, सहा. प्राध्यापक, के. जे. कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अॅण्ड मॅनेजमेंट रिसर्च, पुणे यांचा शैक्षणिक क्षेत्रातील प्रेरणादायी कार्यासाठी पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला.
डॉ. हम्बर्डे यांनी शिक्षण क्षेत्रात दाखवलेली निष्ठा, समाजप्रती असलेले भान आणि विद्यार्थ्यांना दिलेली नवी दिशा यामुळे त्या समाजासाठी आदर्श ठरल्या आहेत. त्यांचे कार्य हे नव्या पिढीला प्रेरणा देणारे ठरावे, यासाठी ट्रस्टने त्यांचा गौरव केला.
कार्यक्रमाचे उद्घाटन विधान परिषदेचे माजी आमदार रामहरी रूपंवार व आयकर विभाग अधिकारी डॉ. नितीन वाघमोडे व आयोजक प्रवीण काकडे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी ट्रस्टचे पदाधिकारी, मान्यवर, पुरस्कारप्राप्त महिला आणि विविध क्षेत्रातील प्रतिनिधी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
अहिल्यादेवी होळकर यांचा आदर्श समोर ठेवून समाजातील महिलांनी पुढे यावे आणि विविध क्षेत्रात आपले कर्तृत्व सिद्ध करावे, असा संदेश या सोहळ्याद्वारे दिला गेला.
n32eh1