श्रावणात भाविकांची पारंपरिक कावड यात्रा उत्साहात पार

देवळी: श्रावण महिन्यानिमित्त देवळी शहरातील देहू-आळंदी भाग क्र. 2, यवतमाळ रोड येथील प्राचीन शिवमंदिरात पारंपरिक कावड यात्रा आणि भजन कार्यक्रम मोठ्या भक्तिभावाने पार पडले.

या यात्रेला भाविकांचा मोठ्या प्रमाणात प्रतिसाद लाभला. यशोदा नदीवरून जल आणून भाविकांनी कावड यात्रेद्वारे देहू-आळंदी पार्क भाग क्र. 2 येथील प्राचीन शिवलिंग पिंडीवर जल अर्पण करून धार्मिक विधी संपन्न केला.

कार्यक्रमाचे आयोजन अत्यंत भक्तिभावाने करण्यात आले असून, यात्रेचा उद्देश श्रावण महिन्यातील धार्मिक परंपरा जपणे आणि शिवभक्तीला चालना देणे हा होता.

या यात्रेला डॉ. नरेंद्रजी मदनकर, वनिता मदनकर, शुभम तर्रेकर, दिलीप शंकरपाळे, विजय नरड, स्वाती नरड, ऋषभ देशमुख, अक्षय दुर्गुडे, युगांतरेकर गणेश पिंपळकर आणि अनेक श्रद्धावान भाविकांनी उत्स्फूर्त उपस्थिती दर्शवली.